Ad will apear here
Next
महावीर फूड बँकेकडून विशेष मुलांना मिठाई
महावीर फूड बँकेच्या वतीने टिंगरेनगर येथील सी. आर. रंगनाथन कर्णबधिर विद्यालयातील विशेष मुलांना खाऊ व मिठाईचे वाटप करण्यात आले.

पुणे : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. सामान्यांप्रमाणे विशेष मुलांनाही दिवाळी आनंदाने साजरी करता यावी, यासाठी महावीर फूड बँकेच्या वतीने टिंगरेनगर येथील सी. आर. रंगनाथन कर्णबधिर विद्यालयातील विशेष मुलांना खाऊ व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यासह ममत्व आणि संपर्क संस्थेतील मुलांनाही मिठाईचे वाटप करण्यात आले. साधारणपणे ५०० मुलांना मिठाई वाटण्यात आली. महावीर फूड बँकेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांच्या पुढाकारातून गेली १४ वर्षे हा उपक्रम सुरू आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक प्रवीण चोरबेले होते. या वेळी स्वयंम सिद्धा ट्रस्टच्या प्रमुख पुष्पा कटारिया, पुना डाळ आणि बेसन मिलचे संजय कटारिया, राजश्री पारेख, संगीता छाजेड उपस्थित होत्या. नेमीचंद संघवी यांच्या स्मृतीनिमित्त आशा संघवी यांनी, तर शांतीलाल छाजेड यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रमोद छाजेड यांनी फराळ दिला. रंगनाथन शाळेचे वसंतराव पाटोळे यांनी सर्वांचे स्वागत करून मुलांना दिलेल्या मिठाईबद्दल आभार मानले. या मुलांनी काढलेली चित्रे सर्वांना भेट देण्यात आली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZSNCF
Similar Posts
विद्यार्थ्यांनी बनवल्या कचऱ्यातून कलात्मक वस्तू पुणे : सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे. विद्यार्थ्यांनी टाकाऊ गोष्टींपासून अनेक नाविन्यपूर्ण कलाकृती साकारल्या असून, अश्म युग ते चंद्रावर उतरण्यापर्यंतचा मनुष्याचा प्रवास येथे पहायला मिळतो
धनत्रयोदशीला दागिने खरेदीसाठी लोकांची गर्दी पुणे : दिवाळीचा उत्साह आता बाजारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
...आणि ‘त्यांच्या’ही डोळ्यांत उजळली दिवाळी! पुणे : सुंदरसा पाट, रांगोळ्यांचा थाट, सुगंधी तेल-उटण्याचा सुवास, औक्षणाचे ताट, नव्या कपड्यांचा साज आणि गोडाचा घास यामुळे ‘त्यांच्या’ डोळ्यांत दिवाळीच्या लाख लाख दीपांचे तेज झळकत होते. चेहरे आनंदाने फुलबाज्यांसारखे खुलले होते.. हे दृश्य होते नामदार गोखले रस्त्यावरील गुडलक चौकात झालेल्या अनोख्या दिवाळीचे
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language